Akkalkot : अक्कलकोट मध्ये ‘दादा’ पॅटर्न २.० चा यशस्वी पर्व ; ४९५७२ मताधिक्यांने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदारकी ; राज्य सरकारच्या योजना आणि २५०० कोटींच्या निधीमुळे जनतेने दिला भाजपाला कौल

अक्कलकोट (प्रतिनिधी): लक्षवेधी ठरलेली महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा ४९ हजार ५७२ मतांनी दणदणीत विजय झाला असून परत एकदा सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट तालुक्याचे ‘जायंट किलर’ ठरले आहेत. मागील निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री आणि एकूण चार टर्म आमदार असलेल्या काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रे यांचा ३६ हजार मतांच्या फरकाने पराभव करत रेकॉर्ड ब्रेक कला होता तर यावेळेस स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करत ४९ हजार ५७२ मतांनी विजय मिळवला.


काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा पराभव झाला असून त्यांना ९८ हजार ५३३ मते मिळाली तर भाजपा महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांना १ लाख ४८ हजार १०५ मते मिळाली. अक्कलकोट विधानसभेसाठी पोस्टलसह २ लाख ५५ हजार ८९५ मतदान झाले होते. याशिवाय इतर पक्षाचे उमेदवार रासपाचे सुनिल बंडगर यांना १३१२, चंचित संतोषकुमार इंगळे यांना १८०७, मनसेचे मल्लिनाथ पाटील यांना १२९३ मते व बसपाचे इकरार शेख यांना ६९४ मते, प्रहार जमीर शेख यांना ७९८ मते मिळाली, इतर अपक्ष पुजा पाटील १४९, प्रसाद बाबानगरे २४३, शिवनिगष्पा वंगे ४२२, सिद्धाराम कोळी २२८. ज्ञानोबा साळुंखे ३११ मते मिळाली तर नोटा ला ११०४ मर्ते मिळाली. ११८ मते बाद झाली तर १९ गते टेन्डरने नोंदविली गेली.


१६ टेबलच्या माध्यमातून एकूण २५ फेरीत मतमोजणी झाली असून मतमोजणी साठी २०५ अधिकारी व कर्मचारी नेमणूक करण्यात आले होते. प्रत्येक फेरीत कल्याणशेट्टी यांनी आघाडी घेतली होती तर १२, २४ आणि २५ व्या फेरीत सिद्धराम मात्र यांना लिड मिळाल्ये होती पण सचिन कल्याणशेट्टी पहिल्या अकरा फेरी अखेर २७ हजार ६७३ मतांनी आघाडीवर होते त्यामुळे सिद्धराम महत्रे यांना विजयाचा जवळ ही जाता आले नाही, २३ व्या फेरी अखेर सचिन कल्याणशेद्री यांना ५०,६५४ मतांची आघाडी घेतली होती पण शेवटच्या दोन फेरी मध्ये सिद्धराम महेत्रे यांनी आघाडी घेतल्यामुळे सचिन कल्याणशेट्टी यांना ४९ हजार ५७२ मतांनी विजयी घोषित केले.
अक्कलकोट विधानसभा निवडणूक विविध विषयावर गाजले सुरुवातीपासून कल्याणशेट्टी यांचे प्रचार यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवल्या मुळे कार्यकर्त्यांमध्ये विजयाची खात्री होती. निकालाच्या आधीच विजयाचे बॅनर ठीक ठिकाणी अक्कलकोट मध्ये लागल्याचे दिसत होते.
निवडणूक प्रचारामध्ये विरोधकांनी अनेक प्रकारे टीका टीपणी करून घेरण्याचे प्रयत्न केले मात्र सचिन कल्याण शेट्टी यांनी कोरोणा काळातील दोन अडीच वर्ष वगळता अवघ्या दोन वर्षांमध्ये केलेल्या कामाचे प्रश्न पत्रिका प्रत्येक गावात घेऊन जाऊन त्याठिकाणी केलेल्या विकास कामाचे माहिती सांगत होते त्याची गुणपत्रिका आज निकालातून दिसून आले
अक्कलकोट शहर, दुधनी , मैंदर्गी, या नगर परिषद सह तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू असल्याने जनता भाजपच्या बाजूने असल्याचे दिसून आले अक्कलकोट बसस्थानक , मालिकर्जून मंदिर , तीर्थ क्षेत्र विकास आराखडा मंजूर करून कामास सुरुवात केल्याने लोकांत समाधान होते तसेच अक्कलकोट तालुक्यातील गेल्या सत्तावीस वर्षापासून रखडलेले देगाव एक्स्प्रेस सिंचन योजनेस अधिवेशन मध्ये पाठपुरावा करून निधी खेचून आणून काम पूर्ण पाणी विधानसभेतील गावात पोचवल्याने शेतकरी खुश होते त्यासोबत लाडकी बहिण योजनेमुळे महिलांनी समाधानी होते यासोबत मुस्लिम, दलित , बंजारा समाजातील मोठ्या प्रमाणात होत असलेले विकास कामामुळे जनता सचिन कल्याण शेट्टी यांना पसंती दिल्याचे दिसून येते
माजी आमदार सिद्रामप्पा पाटलांचा प्रभाव शून्यच
सचिन कल्याणशेट्टी हे मागील निवडणुकीत माजी आमदार सिद्रामप्पा पाटलांमुळेच निवडून आल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होती. वयक्तिक मतभेदांमुळे कल्याणशेट्टींची साथ सोडून म्हेत्रेंना पाठींबा दिलेल्या पाटलांनी कल्याणशेट्टींना अडचणीत आणणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. ज्या तडवळ भागात पाटलांचा वर्चस्व होता, त्याच भागात कल्याणशेट्टींनी भरघोस मतं मिळवली. त्यामुळे एकंदरीत “पाटलांच्या ‘इलाका’त, शेट्टींचा धमाका” असा सामना पहायला मिळाला.
मागासवर्गीय वस्तीचे विकास कामामुळे दादाच्या पाठीशी जनता
अक्कलकोट विधानसभा मतदार संघात आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मोठ्या प्रमाणात निधी देऊन सामाजिक विकास साधल्याने पारंपरिक जे मत काँग्रेस जात होते ते मते मोठ्या प्रमाणात कल्याणशेट्टींच्या पाठीशी राहिल्याने लीड मध्ये वाढ झाले. राजकीय जाणकारांच्या मते सत्तर टक्के मागासवर्गीय मते भाजपाला मिळाल्याचे सांगितले. त्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाचे ही यात मोठा योगदान असून तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी अनेक सभा गाजवले. रिपाइंचे महायुतीची आघाडी असल्याने रिपाइंचे मते देखील प्लस झाले आहेत.
महायुतीचे घटक पक्ष यांच्या सर्वांनी मिळून प्रामाणिक काम केल्याने कुठलीच दगा फटका झालं नाही. यात शिवसेना तालुकाध्यक्ष संजय देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे, रीपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यासह घटक पक्ष सोबत होते.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी यांचे निवडणुकीत प्रभाव दिसून आले नाही.
महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गे गेल्या २.५ वर्षात काल्याणकारी योजना व विकास कामाच्या जोरावर हा विजय झाला असून मी हे सर्व श्रेय अककारकोट तालुक्यातील जनतेला व
भाजपा व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्याना व पदाधिकारी यांना देतो यांचा मुळे हा विजय सुकर झाला असून तालुक्यातील सर्व जनतेचे मी आभार मानतो,
आ. – सचिन कल्याणशेट्टी