गावगाथा

भाविकांना सोई सुविधा पुरविण्यास वटवृक्ष देवस्थान नेहमीच कटीबद्ध – महेश इंगळे

श्रद्धेय भक्तीभावाने नियोजित मुरलीधर मंदिर भक्त निवासाचे भूमिपूजन संपन्न.

भाविकांना सोई सुविधा पुरविण्यास वटवृक्ष देवस्थान नेहमीच कटीबद्ध – महेश इंगळे

नियोजित मुरलीधर मंदीर भक्त निवास भुमीपुजन प्रसंगी महेश इंगळेंनी व्यक्त केले मनोगत.

श्रद्धेय भक्तीभावाने नियोजित मुरलीधर मंदिर भक्त निवासाचे भूमिपूजन संपन्न.

श्री.वटवृक्ष मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न.

भुमीपुजन सोहळ्यास चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२४/१०/२४) –
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री.स्वामी समर्थांचे मुळस्थान असून हजारो स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यानिमीत्ताने स्वामी समर्थांच्या दर्शनाकरीता येथे रोज अनेक भक्त येत असतात. यानिमित्ताने सर्व स्वामी भक्तांना सुलभ स्वामी दर्शन व देवस्थान भक्त निवासाच्या माध्यमातून त्यांना निवासाची सर्वोत्तम सोई सुविधा पुरविण्या बरोबरच अनेक धार्मिक उपक्रमांसह स्वामी भक्तांना आधुनिक निवासाची सुविधा लाभावी हा ध्येय उराशी बाळगून मंदीर समितीच्या वतीने नियोजीत मुरलीधर मंदीर भक्तनिवासाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून भाविकांना सर्वोत्तम
सोई सुविधा पुरविण्यास श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समिती नेहमीच कटीबध्द असल्याचे प्रतिपादन मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. आज गुरूपुष्यामृताच्या शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित श्रीमंत मृदूलाराजे जयसिंहराजे भोसले मुरलीधर मंदिराच्या नियोजित मुरलीधर मंदिर भक्तनिवास बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे व पुष्पा आत्माराम घाटगे यांच्या हस्ते पुरोहित मनोहर देगांवकर, संतोष देगांवकर, मनोज जहागिरदार आदी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात मोठ्या भक्ती भावाने व असिम श्रध्देने संपन्न झाला. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते.
या भूमिपूजन सोहळ्यास मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, श्रीमती उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, पुण्यातील बांधकाम अभियंता नवनाथ बनकर, वंदना बनकर, नामदेव फुलारी, अक्कलकोटचे अभियंता राजेश निलवाणी, वरूण शेळके, सुनिल नायकोडी, कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, देवस्थानचे बांधकाम सल्लागार चंद्रकांत गवंडी, स्वामीकृपा अगरबत्तीचे निर्माते विवेक कानडे, तिपण्णा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री.स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन व मुरलीधर मंदीर श्रीकृष्णांच्या मुर्तीचे पुजन करून भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. उमरग्याचे आमदार ज्ञानराव चौगुले यांनी या सोहळ्यास सदीच्छा भेट दिली. याप्रसंगी श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून आमदार ज्ञानराव चौगुले यांचा सत्कार महेश इंगळे यांनी तर अन्य सर्व मान्यवरांचा सत्कार सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख यांनी केला. याप्रसंगी साऊथ पोलीस स्टेशन गोपनीय पोलीस निरीक्षक धनराज शिंदे, पत्रकार नंदकुमार जगदाळे, बाळासाहेब एकबोटे, सुनिल पवार, मनोज इंगुले, प्रा.शिवशरण अचलेर, रवि कदम, सचिन किरनळ्ळी, चंद्रकांत सोनटक्के, संजय बडवे, चंद्रकांत पाटील आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शिवशरण अचलेर यांनी केले, तर आभार प्रथमेश इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता श्रीशैल गवंडी, रवी मलवे, दर्शन घाटगे, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, ज्ञानेश्वर भोसले, रविराव महिंद्रकर, प्रसाद सोनार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, धनराज पाटील, किरण साठे, तुषार मोरे आदींनी परिश्रम घेतले.

(चौकट – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात स्वामी चरणी भाविकांच्या वतीने नित्यनियमाने अर्पण होणारे हार, फुले (निर्माल्य) इत्यादी साधनांपासून पर्यावरण पुरक अगरबत्ती बनविण्याच्या कामाचे औपचारीक शुभारंभ पुण्यातील अगरबत्ती निर्माते विवेक कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले)

फोटो ओळ – नियोजीत मुरलीधर मंदीर भक्त निवास भुमीपुजन करताना आत्माराम घाटगे, पुष्पा घाटगे, महेश इंगळे व अन्य मान्यवर, तर दुसऱ्या छायाचित्रात मंदीरातील हार, फुले निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्याच्या कार्याचे शुभारंभ करताना महेश इंगळे व अन्य मान्यवर दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button