गावगाथा

अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकारांनी एकत्र येऊन स्वामी समर्थ प्रेस असोसिएशन संघटनेची निर्मिती ; नूतन अध्यक्षपदी बाबासाहेब निंबाळकर तर सचिवपदी शिवानंद फुलारी यांची एकमताने निवड

पत्रकार संघाचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, सचिव शिवानंद फुलारी यांची निवडी प्रसंगी सन्मान करताना विविध दैनिकाचे प्रतिनिधी दिसत आहेत

अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकारांनी एकत्र येऊन स्वामी समर्थ प्रेस असोसिएशन संघटनेची निर्मिती ; नूतन अध्यक्षपदी बाबासाहेब निंबाळकर तर सचिवपदी शिवानंद फुलारी यांची एकमताने निवड

नूतन पदाधिकारी निवड केली. नूतन अध्यक्षपदी बाबासाहेब निंबाळकर तर सचिवपदी शिवानंद फुलारी यांची एकमताने निवड करण्यात आले.*

सह सचिव पदी यशवंत पाटील, उपाध्यक्ष चेतन जाधव, उपाध्यक्ष रविकांत धनशेट्टी, खजिनदार अरविंद पाटील, संघटक योगेश कबाडे, कार्याध्यक्ष प्रशांत भगरे यांची एकमताने निवड करण्यात आले.

प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक करताना योगेश कबाडे यांनी पत्रकारांची एकजूट आणि एकच मजबूत संघटना असावी अशी या बैठकीची मागची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. शहर आणि ग्रामीण भागात विविध पत्रकार संघटना होत्या त्या सर्वांनी एकत्रित येऊन स्वामी समर्थ प्रेस असोसिएशन या नोंदणीकृत संघटनेत सहभागी होण्याचा आणि एकच पत्रकार संघटना कार्यान्वित करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले. या सूचनेला एकमुखी पाठिंबा दिला. यावेळी विरुपाक्ष कुंभार, प्रवीण देशमुख, शिवलाल राठोड, शंकर व्हनमाने, सैदप्पा इंगळे यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आले.

या बैठकीला कार्यकारणी सदस्य सोमशेखर जमशेट्टी, बसवराज बिराजदार, शिवा याळवार, औदुंबर चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, दयानंद दणूरे,गंगाधर नागशेट्टी, आदित्य अंबूरे , रियाज सय्यद आदीजण उपस्थित होते.

फोटो ओळ:- पत्रकार संघाचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, सचिव शिवानंद फुलारी यांची निवडी प्रसंगी सन्मान करताना विविध दैनिकाचे प्रतिनिधी दिसत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button