गावगाथाठळक बातम्या

Akkalkot: श्री राम मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष धर्मगुरू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा तर्फे सत्कार

अन्नक्षेत्र मंडळ अक्कलकोट

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धर्मशास्त्रातील वैभवशाली परंपरा जपण्याचे काम करीत असून, महाप्रसाद सेवेबरोबरच विविध विभागातील कार्य प्रशंसनीय असल्याचे गौरवउद्गार श्री राम मंदिर आयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष, धर्मगुरू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी काढले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी धर्मगुरू स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांना मंडळाच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या महाप्रसाद गृहाच्या वास्तूची संपूर्ण माहिती देण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यांच्या समवेत तम्मा (मामा) शेळके, गुंडू यळमेली, प्रा.भिमराव साठे, मल्लिनाथ शाबादे, चेतन जाधव, प्रसाद हारकुड,प्रा.प्रशांत शिंपी, रवी जोशी, संतोष वगाले,सुशील हिरसकर, स्वामिनाथ बेंद्रे, राहुल वाडे, प्रसन्न गवंडी, रवी वाघमोडे,ह.भ.प.काशिनाथ महाराज गुरव, हसपूरकर, ह.भ.प.आबा महाराज पाटील कुरनुरकर, अभिजित लोके, शिवराज स्वामी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, मनोज निकम, अप्पा हंचाटे, गणेश भोसले, अभियंता अमित थोरात, पुरोहित संजय कुलकर्णी, एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, तानाजी पाटील, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, रमेश हळसंगी, धनंजय निंबाळकर, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, राहुल इंडे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button