गावगाथाठळक बातम्या

Solapur : रविवारी ‘सोलापूर कन्नडीगर संघ’ आयोजित ‘जेनिन होळे ‘ कन्नड चित्र गानोत्सव कार्यक्रमांचे आयोजन

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (प्रतिनिधी): सोलापूर कन्नडीगर संघ सोलापूर दीपावली व कन्नड राज्योत्सव निमित्त आयोजित ‘जेनिन होळे ‘ कन्नड चित्र गानोत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १०.११.२०२४ रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केले असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख बसवराज मणुरे व डॉ.आर वाय.पाटील यांनी सांगितले.

HTML img Tag Simply Easy Learning    

 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेंगळूर येथील प्रसिद्ध गायक,अभिनेते,झी कन्नड सारेगमप मार्गदर्शक डॉ.सुचेतन रंग स्वामी असणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र अंध बाल गायक झी कन्नड सारेगमप सीजन १९ चे फायनालिस्ट रेवणसिद्ध फुलारी या कार्यक्रमात पदार्पण करत असून सोलापूर शहरातील नामवंत हॉस्पिटलच्या डॉक्टर्स प्रायोजक आहे .तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ‘कन्नड कण्मणी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच झी कन्नड सारेगमप सीजन १७ चे विजेता श्रीनिधी शास्त्री हे कलाकार सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सर्व कन्नड भाषिक आणि संगीत रसिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा…असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी यांनी केले आहे .या वेळी डॉ.मल्लिकार्जुन तरनळ्ळी, अकबर मुल्ला,राजशेखर पाटील,रामेश्वर सोलापूरे ,प्रकाश अतनुरे, शरणप्पा फुलारी आदी उपस्थित होते.कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांना कूपन व्यवस्था करण्यात आले आहे .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button