Mumbai crime: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांची गोळ्या झाडून हत्या
राज्यात खळबळ

मुंबई (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आला आहे. वांद्रे पूर्व परिसरात तीन ते चार जणांनी शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास गोळीबार केला. त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. बाबा सिद्धिकी यांच्या छातीला गोळ्या लागल्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यावर तातडीने सिद्धिकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्धिकी यांच्या मृत्यूने वांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत आठवड्याभरात दोन लोक प्रतिनिधींची हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.


गोळीबार करणारे दोघे अटकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या दोन्ही आरोपींना खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.