वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नता अत्यंत मौलिक – टी.विक्रम
पो.म.नि.टी.विक्रम यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.

वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नता अत्यंत मौलिक – टी.विक्रम…

(श्रीशैल गवंडी, दि.१३/११/२४) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज संस्थानचे कामकाज व दिनचर्या हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालत असून मंदिरातील सर्व व्यवस्था देखील अत्यंत उत्तम आहे, त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाप्रमाणे आपणासही स्वामींचे आशिर्वाद व मानसिक समाधान लाभले आहे. वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नता अत्यंत मौलिक असून मनाला समाधान देणारे असल्याचे मनोगत वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी तथा मुंबईचे पोलीस महानिरीक्षक (IGP) टी.विक्रम
यांनी व्यक्त केले. ते नुकतेच सहकुटुंब स्वामींच्या दर्शनाकरिता येथे आले असता बोलत होते. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने टी.विक्रम यांचा व या प्रसंगी उपस्थित पुण्यातील डीवायएसपी विनीत गुप्ता, सचिन काशीद, इन्स्पेक्टर नीरज, एपीआय बागव इत्यादींचा समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला. याप्रसंगी टी.विक्रम बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, सागर गोंडाळ, चित्तरंजन अगरथडे, प्रसाद सोनार, गिरीश पवार, नागनाथ गुंजले, सचिन हन्नूरे, मनोज जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – पो.म.नि.टी.विक्रम यांचा सत्कार करताना महेश इंगळे व इतर दिसत आहेत.
