गावगाथाठळक बातम्या
PCMC : “मतदान न करणाऱ्यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देवू नये ; पालिकेचा हटके जनजागृती

निगडी (प्रतिनिधी): आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड महानगरपालिके तर्फे मतदार बांधवांना जनजागृतीसाठी एक ‘हटके’ मजकूर लिहिलेली बॅनरबाजी पहायला मिळत आहे.

“मतदान न करणाऱ्यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देवू नये” असा मजकूर त्या बॅनरमध्ये झळकत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे विविध पध्दतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्यातलाच असा एक मजकूर आकुर्डी चौकात पहायला मिळाला. पालिकेच्या या हटक्या फलकांने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
