Akkalkot: वटवृक्ष मंदिरात तुळशी विवाह उत्साहात संपन्न

अक्कलकोट (प्रतिनिधी): येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात तुळशी विवाह आज मोठ्या थाटात संपन्न झाला. सायंकाळी ७ वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्यामार्गदर्शनाखाली पुरोहित मोहनराव (गुरुजी) पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या मंगलाष्टके व आरतीने हा तुळशी विवाह संपन्न झाला. नवरदेवाचा मान यंदा तुषार मोरे यांना मिळाला.

यावेळी उपस्थितांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. तुळशी विवाहानंतर मंदिर परिसरात विविध रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, सचिन हन्नूरे, विश्वास शिंदे, चंद्रकांत गवंडी, नरसोबा पवार, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, शिवाजी गुजर, महादेव मलवे, ऋषिकेश लोणारी, श्रीपाद सरदेशमुख, महेश मस्कले, जयप्रकाश तोळणूरे, सागर गोंडाळ आदींसह मंदिर समितीचे सेवेकरी व अन्य स्वामीभक्त उपस्थित होते.
