गावगाथाठळक बातम्या
Vidhansabha election: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत राज्य सरकारकडून एक परिपत्रक जारी करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व व्यवसाय, व्यापार, उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कामगार, कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सुट्टी देणे संबंधित नियोक्त्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
