
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंगाव येथे बालदिन साजरा
गोंगाव — येथील जिल्हा परिषद शाळेत १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती साजरी करण्याबरोबरच पंडित नेहरू यांच्या जयंतनिमित्त साजरा करण्यात येणारा बालदिन साजरा करण्यात आला.बाल दिन हा एक खास बालकांसाठी विशेष दिवस म्हणून जगभर वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीवरून २० नोव्हेंबर हा ‘जागतिक बाल दिन’ अनेक देशांत साजरा होतो. भारतात, भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (१४ नोव्हेंबर) हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी मुख्याध्यापक पुंडलिक विठ्ठलराव वाघमारे ,सहशिक्षक शंकर कारभारी,महादेव चव्हाण,
छाया भोसले,ज्योती आलुरे आदि मान्यवर उपस्थित होते
