Akkalkot: त्रिपुरारीनिमीत्त वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात हजारो भक्तांनी घेतले स्वामींचे दर्शन ; परगावाहून आलेल्या दिंडी व पालखी परिक्रमांचे महेश इंगळेंनी केले स्वागत

अक्कलकोट (प्रतिनिधी): त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनन्य साधारण महत्व आहे. या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मुर्तीस त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त आकर्षक सजावट करण्यात आली होती.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त सायंकाळी हजारो दिव्यांच्या दिपोत्सवाने वटवृक्ष स्वामींचे मंदिर उजळून निघेल. प्रारंभी आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता व ११:३० वाजता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळेे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी, मंंदार पुजारी यांच्या हस्ते अनुक्रमे श्रींची काकड आरती व नैवेद्य आरती संपन्न झाली. याप्रसंगी पुणे येथील स्वामी भक्त सुयोग झेंडे यांच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते भाविकांना फळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.


त्यानंतर राज्याच्या पुणे, सातारा, मालेगाव, बार्शी, जेजुरी, उस्मानाबाद, सोलापूर, मोहोळ, कोल्हापूर आदी विविध भागातून दिंडी सोबत पायी चालत येणारे पालखी सोहळे वटवृक्ष मंदिरात दाखल झाले. याप्रसंगी या दिंडी व पालखी सोहळ्याचे स्वागत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले. या दिंडी व पालखीसोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्तनिवास येथे भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. आलेल्या सर्व स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. पहाटे ५ ते रात्री १० या वेळेत अखंडपणे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

सर्व भाविकांना सुलभ दर्शन होणेकामी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वतः उभे राहून सर्व स्वामी भक्तांना रांगेत टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्याबाबत मार्गदर्शन केल्याने सुलभ दर्शन व्यवस्थेच्या माध्यमातून स्वामी दर्शनाचा लाभ होऊन कृतार्थ झाल्याची भावना उपस्थित स्वामीभक्तांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.