गावगाथाठळक बातम्या

Pune : दक्षिण पुण्यातील या भागात उद्या पाणीपुरवठा राहणार बंद ; पाहा सविस्तर

पुणे (प्रतिनिधी): दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा उद्या (शनिवारी) बंद ठेवला जाणार असून रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

पर्वती एचएलआर गोल टाकीवरून पद्मावती पंपिंग स्टेशनला येणार्‍या 1000 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनीमध्ये पद्मावतीमधील अवंती सोसायटीजवळ गळती सुरू झाली आहे. येथील दुरुस्तीसाठी येथून पाणीपुरवठा होणार्‍या सेमिनरी टाकी, बिबवेवाडी टाकी, तळजाई टाकी, अप्पर इंदिरानगर पंपिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या भगतला पाणीपुरवठा राहणार बंद

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

सहकारनगर, पद्मावती, वनशिव वस्ती, तिरुपतीनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग 1 व 2, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, सुपर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलीसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, धनकवडी परिसर (पार्ट), गुलाबनगर, राऊत बाग, पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, के. के. मार्केट परिसर, मनमोहन पार्क, तोडकर टाऊनशीप, स्टेट बँकनगर, ओम अभिषेक, ओम अलंकार, वास्तुकल्प, गृहकल्प सोसायटी, दामोदरनगर, विद्यासागर सोसायटी, 276 ओटा परिसर, वैभव सोसायटी, कॅनरा बँक परिसर, सुयोग-आदित्य परिसर, योगायोग सोसायटी, रम्यनगरी, जेधेनगर, जनसेवा सोसायटी, नवमित्र सोसायटी, भगली हॉस्पिटल परिसर, कोठारी ब्लॉक, वसंतबाग, अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता, आईमाता मंदिर परिसर, गंगाधाम, गगनविहार, गगनगॅलॅक्सी, विद्यासागर सोसायटी, सोपान महाराज सोसायटी, मार्केट यार्ड संपूर्ण परिसर इत्यादी.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button