*ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही*
राज्य पुरस्कार विजेते साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांचे प्रतिपादन
ता.14 ( पुणे प्रतिनिधी )
ध्येयाचा ध्यास असेल तर कामाचा त्रास वाटत नाही. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणूस अशक्य गोष्टीही शक्य करतो. परंतु त्यासाठी गरज असते ती म्हणजे अफाट मेहनतीची..! मंथन प्रकाशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक मोठे व्यासपीठ मिळत आहे. स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी म्हणून मंथन परीक्षेकडे पाहिले जाते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी मंथन वेलफेअर फाउंडेशनची सामान्य ज्ञान परीक्षा अत्यंत महत्त्वाची असून त्यातून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे होत असल्याचे मत राज्य पुरस्कार विजेते साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी रविवार दिनांक 13 जुलै रोजी शिक्रापूर येथील भव्य साम्राज्य लॉन या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
अहिल्यानगर येथील मंथन फाउंडेशन वेलफेअर ही संस्था गेली पंधरा वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी कार्य करते. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, त्यांची बैठक तयार व्हावी आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही संस्था मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करते. इतकेच नव्हे तर या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. यावर्षी या भव्य समारंभात अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध बालसाहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एकनाथ आव्हाड लाभले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर हे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी व्याख्याते शशांक मोहिते, राज्य समन्वयक संभाजीराव देशमुख, सोमनाथ कचरे, प्रीतम पाटील, अमोल दरेकर, मंदार कळमकर, शिल्पा महामुनी, श्रीकांत वेताळ आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तुषार शिंदे यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
*चौकट*
मंथन वेल्फेअर फाउंडेशन संचलित मंथन सामान्य ज्ञान परीक्षा विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात त्यामुळे ग्रामीण भागात शिष्यवृत्तीत येणाऱ्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. या स्पर्धा परीक्षांच्या तयारीमुळे विद्यार्थ्यांची बैठक, परीक्षेची तयारी आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. सराव सातत्य आणि चिकाटी या गोष्टीमुळेच विद्यार्थी आपले ध्येय अचूक साध्य करतात.
*सचिन बेंडभर*
-राज्य पुरस्कार विजेते साहित्यिक शिक्षक
————-
फोटो, इंटरनेट, प्रकाशन
ओळ : विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सचिन बेंडभर
Back to top button
×
No WhatsApp Number Found!