गावगाथा

अन्नछत्र मंडळाकडून धार्मिकतेला महत्व देत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रात ही उत्कृष्ट कार्य –जिल्हाधिकारी दिलीपराव स्वामी

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अन्नछत्र मंडळाकडून धार्मिकतेला महत्व देत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रात ही उत्कृष्ट कार्य –जिल्हाधिकारी दिलीपराव स्वामी

अक्कलकोट:- प्रतिनिधी*
*अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांचे चिंरंजीव जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे नातू अमोलराजे जन्मेजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या कुशल नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून धार्मिकतेला महत्व देत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक या क्षेत्रात ही उत्कृष्ट काम करीत असल्याचे मनोगत छ. संभाजी नगर चे जिल्हाधिकारी दिलीपराव स्वामी यांनी व्यक्त केले.*

ते छ. संभाजी नगर जिल्हाधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारले असून, जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले हे विविध कार्यक्रमानिमित्त जालना, छ.संभाजी नगर च्या दौऱ्यावर होते ते छ. संभाजी नगर येथे गेले असता जिल्हाधिकारी स्वामी यांची भेट घेऊन त्यांचा न्यासाच्या वतीने श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी दिलीपराव स्वामी यांनी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचे स्वागत केले. या प्रसंगी दिलीपराव स्वामी हे बोलत होते.

या प्रसंगी श्री क्षेत्र अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संतोष भोसले, लाला राठोड, रोहन शिर्के, रोहित खोबरे, अश्पाक काझी, शिवराज स्वामी, प्रशांत शिंदे, स्वामिनाथ गुरव, रमेश हळसंगी, संतोष माने आदिजन उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button