गावगाथा

स्वामी दर्शनाने दीपावलीचा आनंद द्विगुणित – न्यायमुर्ती बी.यु.देबडवार

न्यायमुर्ती बी.यु.देबडवार यांचा सहकुटूंब महेश इंगळे यांनी देवस्थान कार्यालयात सत्कार केल्यानंतरचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.

स्वामी दर्शनाने दीपावलीचा आनंद द्विगुणित – न्यायमुर्ती बी.यु.देबडवार

[प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१६/११/२४] यंदाच्या दीपावलीच्या पूर्वार्धात नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. दीपावलीच्या पूर्वार्धात स्वामी दर्शनाच्या झालेल्या या लाभाने दीपावलीचे आनंद द्विगुणीत होईल असे प्रतिपादन
मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा औरंगाबाद
विद्यापीठ न्यायाधिकरणचे अध्यक्ष बी.यु.देबडवार यांनी केले. ते नुकतेच सहकुटूंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी नि.न्यायमुर्ती बी.यु.देबडवार यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी न्यायमुर्ती बी.यु.देबडवार बोलत होते. पुढे बोलताना बी.यु.देबडवार यांनी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी-ऐश्वर्य याचे वर्धन व्हावे असे मनोगत व्यक्त करून चेअरमन महेश इंगळे व मंदिर विश्वस्त समिती, सेवेकरी यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, रवी मलवे, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – न्यायमुर्ती बी.यु.देबडवार यांचा सहकुटूंब महेश इंगळे यांनी देवस्थान कार्यालयात सत्कार केल्यानंतरचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button