गावगाथाठळक बातम्या
Mumbai: सेंट टेरेसा शाळेत बालदिन उत्साहात

मुंबई (प्रतिनिधी): वांद्रे येथील सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल मध्ये नुकताच १४ नोव्हेंबर रोजी असणारा बालदिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मुलांसाठी खास आकर्षण डी जे लावण्यात आला होता.अनेक प्रकारचे फूड स्टॉल, राईड्स, गेम्स यामुळे मुल खुश होती.

मुख्याध्यापक फादर निकी, उपमुख्यध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज, फादर शिनोय यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी कमिटीने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.

अनेक पालकांनी देखील यावेळी याचा आनंद घेतला.या शाळेत कायमच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.एकंदरीत माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील सर्वच विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवला.
