गावगाथा

गळोरगी येथील शिबिरात ५३ जणांचे रक्तदान, गळोरगीकरांनी घडविला एक नविन आदर्श, जपली सलग २६ वर्षांची रक्तदानाची अखंड परंपरा

रक्तदान शिबीर

गळोरगी येथील शिबिरात ५३ जणांचे रक्तदान, गळोरगीकरांनी घडविला एक नविन आदर्श, जपली सलग २६ वर्षांची रक्तदानाची अखंड परंपरा
ता. अक्कलकोट मौजे गळोरगी येथील श्री रेवणसिध्देश्वर यात्रा महोत्सव २०२६ निमित्त श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच गळोरगी आणि गळोरगी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात एकुण ५३ जणांनी रक्तदान केले. रक्तदानाचे हे सलग २६ वे वर्ष होते. मागील २६ वर्षापासुन सर्व गळोरगीकरांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावच्या यात्रेनिमित्त रक्तदान यशस्वीपणे राबवुन संपुर्ण सोलापुर जिल्हयात रक्तदान बाबतचा एक नविन आदर्श घडविला आहे. प्रारंभी रत्तदान शिबिराचे उदघाटन माजी सैनिक श्री बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज फोटो पुजन पोलिस पाटील श्री सुरेश मैंदर्गी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री रेवणसिध्देश्वर युवा मंच संस्थापक अध्यक्ष श्री सिध्देश्वर बिराजदार यांनी केले. सर्व रक्तदात्यांचे, उपस्थितांचे व आयोजकांचे आभार ठाकरे शिवसेनेचे गळोरगी ग्राम अध्यक्ष श्री राजशेखर अंदोडगी व कॅांग्रेस अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीशैल पुजारी,श्रीशैल पाटील , श्री अप्पण्णा झग्गे, श्री विशाल बिराजदार,श्री महेश बिराजदार , वे. विनायक स्वामी, वे राहुल हंद्राळमठ,श्री शिवपुत्र पाटील, श्री प्रेम अंदोडगी ,श्री चेतन निरोणे, श्री सोमनाथ बिराजदार, श्री मल्लिनाथ मैंदर्गी,श्री सिध्दाराम बिराजदार,श्री शरण पाटील, श्री लक्ष्मण वग्गे, कु आदीत्य जकापुरे, श्री जयशेखर बिराजदार ,श्री राचप्पा बिराजदार, ,श्री शशिकांत सुतार, श्री योगीराज मैंदर्गी,श्री सिध्दाराम कुंभार,श्री गंगाधर संगापुरे, श्री उमेश बणजगोळ,श्री मल्लिनाथ आळगी,श्री रामण्णा जमादार,श्री राकेश तळवार,श्री गणेश कोळी,श्री मल्लिनाथ आजुरे,श्री यल्लप्पा म्हाळु ,श्री भिमराव कासेगावकर आदींनी परीश्रम घेतले. यावेळी श्री सिकंदर जमादार, श्री खाजेभाई नदाफ,L I C M D R T मेंबर श्री शिवानंद बिराजदार, श्री प्रकाश मैंदर्गी,श्री बसवराज जकापुरे,श्री विठ्ठल भरमशेट्टी (हन्नुर), श्री संतोषकुमार आळगी,श्री कबिर नदाफ, श्री पृथ्वीराज बिराजदार, श्री समर्थ बिराजदार,श्री मेहबुब शेख,श्री काशिनाथ व्हनकोळ, श्री उमेश बणजगोळ व गळोरगी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button