गावगाथा

वागदरी पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसकडून सतीश कल्याणी पालापुरे यांचे दावेदारी ठळक

जिल्हा परिषद निवडणूक रणधुमाळी

वागदरी पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसकडून सतीश कल्याणी पालापुरे यांचे दावेदारी ठळक
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला असून,पक्षाच्या तळागाळातील निष्ठावंत व सातत्याने काम करणारे कार्यकर्ते सतीश कल्याणी पालापुरे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणारा,संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेला आणि सामाजिक जाण असलेला कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख तालुक्यात निर्माण झाली आहे.सतीश पालापुरे यांनी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष तसेच विद्यार्थी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अक्कलकोट तालुक्यात व्यापक स्वरूपात काम केले आहे.केवळ पदे भूषवून थांबणे नव्हे,तर प्रत्यक्ष बूथ पातळीवर जाऊन काम करण्याची त्यांची पद्धत राहिली आहे.बूथ रचना,बूथ नियंत्रण,बूथ प्रमुखांची नियुक्ती व प्रशिक्षण अशा संघटनात्मक कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.निवडणूक काळातच नव्हे,तर निवडणूक नसतानाही पक्ष गावागावात जिवंत राहावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले.शाळांमध्ये डस्टबीन व प्रथमोपचार पेटी वाटप,सार्वजनिक कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार,गावपातळीवर ध्वनिक्षेपक भेट,वृक्षारोपण,खाऊ वाटप,यात्रांमध्ये पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.सतीश पालापुरे हे सत्ता,पद किंवा तात्पुरत्या फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्या राजकारणापेक्षा वेगळे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहेत.पक्ष कठीण काळातून जात असताना देखील त्यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेत काम सुरूच ठेवले,हे त्यांच्या निष्ठेचे मोठे उदाहरण मानले जाते.शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीतही सतीश पालापुरे हे सक्षम आणि आधुनिक दृष्टिकोन असलेले नेतृत्व ठरतात.
त्यांनी B.Sc.(रसायनशास्त्र), MBA (HR व मार्केटिंग) तसेच कन्नड माध्यमातून M.A. हे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.ग्रामीण भागातील प्रश्न,रोजगार,शिक्षण,आरोग्य आणि विकास यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे,असे त्यांच्या सहकाऱ्यांचे मत आहे.
आता वागदरी पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली असून, “पक्षाने मला संधी दिली तर वागदरी मतदारसंघात काँग्रेसचा विचार अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,”असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.वागदरी परिसरात युवक,विद्यार्थी,सामान्य कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून सतीश पालापुरे यांच्या नावाची चर्चा सुरू असून,निष्ठावंत,शिक्षित आणि संघटनात्मक अनुभव असलेला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button