आष्टे प्रशाला, भुरीकवठेचा चित्रकला ग्रेड परीक्षेत १००% निकाल; विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
भुरीकवठे / प्रतिनिधी :
ता. अक्कलकोट येथील शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशाला, भुरीकवठे या विद्यालयाने शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. प्रशालेतील एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही चित्रकला ग्रेड परीक्षांचे निकाल १०० टक्के लागले असून एकूण ४९ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या १९ पैकी १९ विद्यार्थी यशस्वी ठरले. यामध्ये प्रथम श्रेणीत श्रीशैल नवनाथ सुतार, तर द्वितीय श्रेणीत अमन इनामदार, मयूर मरबे, कोमल बेळंब व अजित रूपनूर यांनी उत्तम कामगिरी केली.
तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ३० पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत चंद्रिका धा. आष्टे, ज्ञानेश्वरी रा. परीट, नेहा ने. कांबळे, राहुल श. दसाडे व श्रावणी सु. मुळजे यांनी घवघवीत यश मिळवले. द्वितीय श्रेणीत अंजली परीट, लक्ष्मी कणमुसे, लक्ष्मी वडरे, समृद्धी कुंभार, वैष्णवी भोसले व श्रेयस ढंगापुरे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले ते प्रशालेचे कलाशिक्षक श्री. मोनेश्वर लक्ष्मण सुतार सर यांचे. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अप्पासाहेब गवसणे, सचिव श्री. कुंदन आष्टे, तसेच संचालक मंडळातील श्री. विजयकुमार आष्टे, श्री. शिरीष खुने, श्री. सुरेश बिराजदार, महादेवी आष्टे, शोभाताई माळगे, मुख्याध्यापक श्री. राजकुमार कुलकर्णी व ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!