दिन विशेष

*कोपरखैरणे येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम संमेलन संपन्न*

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कविता डॉट कॉम चे मासिक साहित्य संमेलन संपन्न झाले.

*कोपरखैरणे येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम संमेलन संपन्न*

*प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख* :

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात संवाद नात्यांचा *कविता डॉट कॉम* संमेलन ३१ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाले. नेरुळ जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष व ग्रंथालयाचे अध्यक्ष विकास साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या संमेलनात मांन्यवर व नवोदित कवींनी आपल्या कविता उत्स्फूर्तपणे सादर केल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या *कविता डॉट कॉम* मासिक संमेलनात नवोदित कवींनी अत्यंत आत्मविश्वासाने कविता सादर केल्या.

विकास साठे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, साहित्य हा समाजाचा आरसा असतो. त्यामध्ये समाजातल्या ताणतणावांचे, त्यांच्या प्रश्नांचे व सांप्रत वातावरणाच प्रतिबिंब उमटणे गरजेचे असते. एक सामाजिक बांधिलकी म्हणून साहित्यिकाने *जागल्याची* भूमिका परखडपणे, बेडरपणे पार पडणे गरजेचे आहे. आजच्या नवोदित साहित्यिकांनी साहित्यनिर्मिती करताना खूप वाचन करणं गरजेचे आहे. एकविसावे शतक हे माहितीचे युग आहे . अत्यंत सजगतेने समाजातील निरीक्षणे नोंदवली पाहिजेत. वाचनाने त्यांची शब्दसंपदा वाढेल, अनुभवाच्या कक्षा रुंदावतील. रामदास स्वामी म्हणतात *दिसा माजी थोडेतरी लिहीत जावे* त्याप्रमाणे लिखाणामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे, आणि *प्रगटावे अभ्यासुनी* या उक्तीप्रमाणे लिहिलेलं साहित्य कसदार असावं. आद्य कवी मुकुंदराज १२ व्या शतकात होऊन गेले. सुरुवातीचं साहित्य संत काव्य, अनुवादित साहित्य, लोकसाहित्य, कीर्तन, भारुड, ओव्या इत्यादी स्वरूपात होतं . ते आता वेगवेगळ्या आकृतीबंधात, मुक्त काव्य, गझल चारोळ्या पर्यंत त्याची प्रगती झाली आहे. एकंदरीत, साहित्य संमेलनात सादर केलेल्या सर्व कवितांचा साहित्यिक दृष्टिकोनातून आढावा घेऊन नवोदित कवींना मार्गदर्शन केले.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कविता डॉट कॉम चे मासिक साहित्य संमेलन संपन्न झाले.
———————————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button