श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊरच्या विविध शिक्षणशाखेत संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार महादेव पाटील यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनी केले.

श्री काशी विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ जेऊरच्या विविध शिक्षणशाखेत संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार काही महादेव पाटील यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी माजी आमदार कै. महादेव पाटील हे आमदार पद भूषवलेले असतानाही त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी आणि गोरगरिबा प्रति त्यांची असलेली बांधिलकी आदी बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.त्यांच्यासोबत कार्यरत राहिलेले अनेक ज्येष्ठ नागरिक, गावकरी बांधव आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी देखील आवर्जून उपस्थित होते. काशीविश्वेश्वर हायस्कूल जेऊर येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच शिवाजीराव कलमदाणे, काशिनाथ कवठे,सूर्यकांत चौधरी,काशिनाथ रामपुरे, सुरेश सोनार,शिवपुत्र चौलगी,सिद्धाराम कापसे, रवीकांत स्वामी, श्रीमंत झंप्पा, इरप्पा कोळी,नूरु राठोड,सोमय्या स्वामी सर ,बसवराज हिंगमीरे,चनमलप्पा कापसे,लाडन कोरबू, इरण्णा कणमुसे,रेवणप्पा बोरीकरजगी,खंडप्पा वग्गे,अरविंद सोनार,सुभाष पाटील,अंबाराया कनोजी,सतीश फुलारी, संजय गुरव, काशिनाथ कडगंची
शिवकुमार उमराणी,महादेव फुलारी सर ,मल्लिकार्जुन भणगे,पुंडलिक पांढरे, विश्वनाथ चपळगांव, मुख्याध्यापक राजशेखर चौधरी यांच्यासह श्री काशिलिंग देवस्थान पंच कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनी केले.
