कोळी महासंघाच्या वतीने कुलगुरू महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध गावात प्रतिमा पूजा करून साजरा
जयंती विशेष २०२३

*तालुका कोळी महासंघाच्या वतीने कुलगुरू महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त अक्कलकोट शहर व तालुक्यातील विविध गावात प्रतिमा पूजा करून साजरा करण्यात आला.*

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील, युवा राज्याध्यक्ष चेतनभैय्या पाटील, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी, जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यात व शहरांमध्ये कुलगुरू महर्षी वाल्मिकी जयंती साजरा करण्यात आले.

अक्कलकोट पंचायत समिती समोर महर्षी वाल्मिकी मार्ग या फलकाचे उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोळी महासंघाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अक्कलकोट शहर, पान मंगरूळ, संगोगी, हंजगी, अंकलगी, शिरवळ, उडगी, मैसलगी, मुंढेवाडी, बसलेगाव कुडल, आळगी बोरी उंबरगे, समर्थ नगर , जकापूर, शिरशी, गुड्डेवाडी, तोळनूर, चुंगी, सातन दुधनी, शावळ, कलहिप्पलगे, दुधनी, नागणसूर,. देशमुख बोरगाव, अचेगाव, मैंदर्गी, केगाव बु. कोळी वस्ती केगाव, इटगी, ममनाबाद, बोरोटी, कलकर्जळ, हालचिंचोळी, कल्लप्पावाडी, किणीवाडी यासह विविध गावात कुलगुरू महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आला.
