गावगाथाठळक बातम्या

Nitin Gadkari: काम नीट करा, अन्यथा बुलडोझरखाली टाकू ; नितीन गडकरींची कंत्राटदारांना तंबी

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई (प्रतिनिधी): ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यास त्याला सहा महिने निविदा भरता येणार नाही. असे धोरण आम्ही तयार केले असून, अधिकाऱ्यांवरही विशेष कारवाई करून त्यांना कामावरून निलंबित केले जाईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

माझ्या विभागाने ५० लाख कोटींची कामे केली आहेत. आम्ही पारदर्शक आहोत, डेडलाइनसाठी वचनबद्ध आहोत आणि आम्हाला निकाल हवे आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

ठेकेदाराने कामे न केल्यास त्याला बुलडोझरखाली टाकू, असे मी जाहीर सभेत सांगितले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी लोकसभेत दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या उणिवा मांडल्या होत्या. त्य अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला गडकरी उत्तर देत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी गडकरींनी रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला. रस्ते प्रकल्पातील कंत्राटदारांचे दुर्लक्ष आणि टोल केंद्रांची संख्या यावरही त्यांनी उत्तर दिले. गडकरींना 150 हून अधिक लोकांच्या मृत्यूबद्दल भाष्य करायचे होते. नागौरच्या खासदाराने सांगितले होते की, एकट्या दौसामध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेस वेवर तैनात असलेल्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाई आणि चौकशी अहवालाबाबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडून माहिती मागवली होती.

HTML img Tag Simply Easy Learning    

कंत्राटदारांवर काय म्हणाले गडकरी? 

१. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग

२. जागतिक स्तरावर सर्वात कमी वेळेत बांधला महामार्ग

३. या प्रकल्पाची किंमत एक लाख कोटी रुपये

४. रस्त्यावरील सिमेंटच्या थरामध्ये अनेक ठिकाणी फरक

५. साधन सामुग्रीमध्ये कोणतीही बनवाबनवी नाही

६. हा थर काही ठिकाणी जमिनीखाली गाडला गेला

७. मंत्रालयाने ती दुरुस्ती केली आहे

८. थरात तफावत आढळून आली त्यासाठी ४ कंत्राटदार जबाबदार

त्यांच्या कंत्राटासाठी कोणत्याही ठेकेदाराला मंत्रालयात यावे लागले नाही. लक्षात ठेवा. यंदा कंत्राटदारांना काळ्या यादीत कसे टाकले ते पहा. त्यांना पूर्णपणे मारून सरळ करेल. आम्ही कोणाशीही तडजोड करत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button