गावगाथा

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कारभारी परिवाराच्या वतीने सत्कार

येथील संजय कारभारी परिवाराच्या वतीने सत्काराप्रसंगी सातलिंग स्वामी, पवनकुमार इंगळे सह सत्कारमूर्ती डॉ. राजाराम शेंडगे, बाबा जाफरी, डॉ. महेश मोटे, शिवशंकर हत्तरगे व कारभारी कुटुंबीय.

विविध क्षेत्रातील व्यक्तींचा कारभारी परिवाराच्या वतीने सत्कार

मुरूम, (प्रतिनिधी) : येथील संजय कारभारी (कलदेव लिंबाळा) परिवाराच्या वतीने मुरुम येथील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार रविवारी (ता. ७) रोजी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग विभागाचे (मंत्रालय) अध्यक्ष ना. बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवनकुमार इंगळे होते. या सत्कारमूर्तीमध्ये उमरगा तालुक्यात प्रथम डॉ. के. डी. शेंडगे आयुर्वेदिक महाविद्यालय आणल्याबद्ल डॉ. के. डी. शेंडगे रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजितदादा पवार गटाचे) उमरगा तालुकाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी यांची निवड झाल्याबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संशोधन मंडळाच्या सदस्य पदी प्रा. डॉ. महेश मोटे यांची निवड झाल्याबद्ल, भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी शिवशंकर हत्तरगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल, फेटा व पुष्पहार घालून कारभारी परिवाराच्या वतीने मित्रांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा सचिव प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, अंनिसचे कार्यकर्ते देविदास पावशेरे, कलदेव लिंबाळाचे सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच सुनिता पावशेरे, कमलबाई कारभारी, संचिता कारभारी, सत्यवती कारभारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी बालाजी व्हनाजे आदींची उपस्थिती होती. बाळासाहेब गिरीबा, संतोष धुमूरे, अजय बिराजदार, अमोल गिरीबा, अन्वर जिलानी, अमृत कंटेकुरे, शिवा सुतार, सायली कारभारी, साक्षी कारभारी, समर्थ कारभारी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत ग्रामविकास अधिकारी संजय कारभारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिंक्य मुरूमकर तर बालाजी कारभारी यांनी आभार मानले. याप्रसंगी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होता. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील संजय कारभारी परिवाराच्या वतीने सत्काराप्रसंगी सातलिंग स्वामी, पवनकुमार इंगळे सह सत्कारमूर्ती डॉ. राजाराम शेंडगे, बाबा जाफरी, डॉ. महेश मोटे, शिवशंकर हत्तरगे व कारभारी कुटुंबीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button