दसरा यात्रा महोत्सव निमीत्त किणी येथे सीमोल्लंघनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा
सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचा दिव्य सानिध्यात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

दसरा यात्रा महोत्सव निमीत्त किणी येथे सीमोल्लंघनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा

अक्कलकोट दि.२६(प्रतिनिधी)
तालुक्यातील किणी येथील श्रीमंतलिंग मल्लिनाथ पत्रिबन देवस्थान २६ वा दसरा यात्रा महोत्सव निमीत्त जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा प. पुज्य सद्गुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात सीमोल्लंघनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
भाविकांनी यावेळी बोलो भारत माता की जय ! वंदे मातरम्! आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला. श्रीक्षेत्र श्रीमंतलिंग मल्लीनाथ पत्रिबन देवस्थान येथे हजारो वर्षा पासून स्वयं बेलाची झाडे आहेत.यामुळे येथे शिव पार्वती मातेंचा वास्तव्य असल्याने आजही या पवित्र स्थानी कोणही आल्यास टेन्शन मुक्ती होतो.या दसरा यात्रेस तुळजापूर, उमरगा, आंळद व अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सोमवार दि.२३ रोजी संध्याकाळी किणी गावातून आप्पशा कोठमाले यांच्या घरातून श्रीचे कुंभ मिरवणूक पत्रिबन देवस्थान पर्यंत काढण्यात आली.यानंतर रात्री नऊ वाजता मंगलाष्टक म्हणून होमहवन करण्यात आला. मंगळवार दि. २४ रोजी पहाटे श्री चे महारुद्राभिषेक कार्यक्रम झालं. सकाळी सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचा दिव्य सानिध्यात सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
