गावगाथाठळक बातम्या

Pandharpur: पंढरीतील एनआयटी सेंटरला उत्कृष्ट पुरस्कार प्रदान

पंढरपूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम.के.सी.एल.) च्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट व्यावसायिकता व प्रवेशाचा पुरस्कार यंदा सलग 17 व्या वर्षी एन.आय.टी कॉम्प्युटरला मिळाला असल्याने पंढरीतील एनआयटी कम्प्युटरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा मिळाला आहे.

 

      डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थातची वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळेस एन.आय.टी कंप्यूटरच्या वतीने केंद्र प्रमुख गणेश जाधव व शाम गोगाव यानी 

हा पुरस्कार व्यवस्थापकीय संचालिका वीणा कामत मॅडम यांचे हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या संपूर्ण एनआयटी कम्प्युटरच्या यशा मध्ये आमचे सहकारी मॅडम समृद्धी कालेकर,अमृता कुलकर्णी व लक्ष्मी गांधी मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले आहे

MS-CIT यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत, रौप्य महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा एन .आय. टी. कॉम्प्युटर्सला पुरस्कृत करण्यात आल्यानं एन आय टी कॉम्युटर मागील 23 वर्षा पासून राबवित असलेल्या विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रशिक्षण, शासनाकडून आलेले वेगवेगळे प्रशिक्षण, सर्वसामान्य विद्यार्थी व गरीब होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना केलेले सहकार्य , आजपर्यंत विद्यार्थ्यांनी दिलेल्या विश्वास. याबद्दल पुन्हा एकदा एम.के.सी.एल कडून शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी लोकल लीड सेंटरचे रोहित जेऊरकर, हारून शेख, विभागीय समन्वयक महेश पत्रीके, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अमित रानडे, अतुल पतौडी, कुंभार, कौशल, डॉ दीपक पाटील, कटकधोंड, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button