गावगाथा

मुख्याध्यापक फादर निकी यांचा ५० वा वाढ दिवस पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देऊन झाला साजरा

वाढदिवस विशेष

मुख्याध्यापक फादर निकी यांचा ५० वा वाढ दिवस पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेचा संदेश देऊन झाला साजरा

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

वांद्रे मुंबई येथील सेंट टेरेसा शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांचा सुवर्ण मोहत्सवी ५० वा वाढदिवस त्यांनी स्वतः स्वच्छता जनजागृती आणि पर्यावरण रक्षणासाठी आपण कटिबध्द असायला हवे असा संदेश उपस्थितांना देऊन साजरा करण्यात आला.यावेळी जर आपण कोणतेही पदार्थ वस्तू वाया घालविली नाही तर कचऱ्याचा डब्बा म्हणजेच डस्टबीन आपल्याला वापरवेच लागणार नाही.यावेळी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि आपली प्रत्येकाची जबाबदारी आणि कृती ही पृथ्वी म्हणजेच आपली धरणीमाता वाचवायला हवी असे फादर निकी यांनी सांगून सेव्ह मदर अर्थ आणि स्वच्छता ड्राइव्ह लॉन्च करून त्याचे प्रतीक म्हणून सर्वांना पर्यावरण रक्षक बॅजेस लावण्यासाठी देण्यात आले.पर्यावरण गीत देखील फादर यांनी स्वतः गायले आणि सध्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच असून पर्यायाने पर्यावरण हानी होत आहे आणि याचा दुष्परिणाम म्हणून ग्लोबल वॉर्मिग चे संकट सर्वत्र घोंघावत आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी शाळेतील शिक्षिका मारिया व्होरा आणि सीमा जोसेफ यांनी शाळेत २५ वर्ष सर्व्हिस पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.संस्थेचे मॅनेजर फादर हेन्री यांचा देखील त्यांची एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर म्हणून बढती मिळाल्याने सत्कार करण्यात आला.वाढ दिवसाच्या या शुभ प्रसंगी फादर निकी, टीचर मारिया टीचर सीमा यांना शुभेच्छा देण्यासाठी शाळेच्या उपमुख्यध्यापिका रोझ लोबो, पर्यवेक्षक फिलिप रॉड्रिग्ज, ऍडमीन फदर शीनोय, विद्यार्थी, शिक्षक आणि स्टाफ असे सर्वजण उपस्थित होते. नाच-गाणी, आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.इयत्ता आठवी आणि नववी चे कमिटीने या कार्यक्रमाची यशस्वी आखणी केली होती.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button