गावगाथाठळक बातम्या
PCMC : रावेत येथील जिजाऊ उद्यानातील अनेक व्यायाम साहित्य बंद पडलेल्या अवस्थेत ; लवकर दुरुस्त करण्याची मागणी

निगडी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या रावेत येथील भव्य राजमाता जिजाऊ उद्यानातील अनेक व्यायाम साहित्य बंद अवस्थेत आहेत.


गेल्या काही दिवसांपासून या बंद आहेत. निगडी, रावेत आणि चिंचवड परिसरातील शेकडो लोक या उद्यानात नियमित व्यायामासाठी येत असतात. व्यायामाच्या वापरासाठी हे साहित्य अत्यंत अनुकूल आणि सोप्पी असल्याने अनेक वयोवृद्ध नागरिकांनाही हाताळता येतात. मात्र सध्या त्यातील पाय आणि कमऱ्यांचे व्यायाम करणारे साहित्य बंद अवस्थेत आहेत. त्या लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
