Pune : आरटीओ आणि एरोमाॅल अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची, कॅब चालक घेणार लेखी चाचणी ; ओला , उबेर विरोधात कॅब चालक पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत

पुणे (प्रतिनिधी): पुण्यात ओला , उबेरसारख्या ऑनलाईन कंपन्यांविरोधात रिक्षा आणि कॅबचालक पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. खटुआ समितीच्या ठरावानुसार जे दर रिक्षा आणि कॅबसाठी मिळायला हवे ते मिळत नाही. ओला, उबेरकडून अत्यंत अल्प दर दिले जातात, तर याऊलट प्रवाशांकडून २०-३० टक्के जास्तीचे दर आकारले जातात. यामुळे कॅबचालकांनी पुन्हा एकदा मोठा आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत. अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ केशव क्षीरसागर यांनी दिली.


भारतीय गिग कामगार मंच तर्फे कष्टकरी महासभा डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.९) ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले सभागृहात टिंबर मार्केट येथे पार पडली.

भारतीय मजदुर संघा तर्फे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ व पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी यावेळी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर दिला.

यावेळी बोलताना डॉ केशव नाना क्षीरसागर म्हणाले की, सदर ऑनलाईन कंपन्यांना पुणे आरटीओ ने परवाना नाकारलेले असताना सुद्धा ते खुलेआम आपला व्यवसाय करत प्रवाशांना लुटत आहेत. याशिवाय या कंपन्या, एअरपोर्ट अथोरिटी असलेल्या एरोमाॅल ला केंद्र सरकारचे नियम धुडकावून व्यवसाय करत आहेत. हा निमयात बसणारा नाही. त्यामुळे बुधवारी (दि.११) आम्ही सर्व रिक्षा आणि कॅबचालकांसमावेत निदर्शने करून अधिकाऱ्यांची लेखी चाचणी घेणार आहोत.
या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत….
1) ओला उबर कडे कॅब अग्ग्रेगेटर चा परवाना आहे का ?
२) तुम्ही त्यांचा परवाना अर्ज रद्द केल्यावर त्यांनी STAT मध्ये अपील केले, तेथे तुमच्या निर्णयाला स्टे ऑर्डर मिळाली आहे का ? असेल तर प्रत दाखवा.
3) मा. सर्वोच्च न्यायालय , मा. मुंबई उच्च न्यायालय तसेच केंद्र सरकारच्या कॅब अग्ग्रेगेटर नियमांनुसार या कंपन्यांना बिना परवाना व्यवसाय करता येतो का ?
4) खतुआ समितीनुसार RTA ने जाहीर केलेले दर प्रत्येक रिक्षा व कॅब चालकास मिळणे बंधनकारक आहे का नाही ?
5) ओला उबर परवाना अर्ज फेटाळल्यानंतर तुम्ही जशी कॅब चालकांवर हजारो रुपयांची चलने केली, तशी एक तरी कारवाई या कंपन्यांवर केली का ?
6) केंद्र सरकारच्या एअरपोर्ट ऑथोरीटी च्या अखत्यारीत येणाऱ्या एरोमॉल ला, केंद्र सरकारचे नियम धुडकावून व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांशी कोणताही परवाना नसताना करार करणे व सदर कंपन्यांनी बेकायदेशीर रित्या नागरिक व चालकांची आर्थिक पिळवणूक कायद्यात बसते का ?
7) सदर बेकायदा कंपन्यांची मक्तेदारी व्हावी म्हणून विमान प्रवाश्यांना, रोड टॅक्स भरून कायदेशीर रित्या व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व कॅब चालकांकडून सेवा घेण्यास मज्जाव करण्यासाठी दंड लावण्याचा अधिकार एरोमॉल ला आहे का ?
8) एरोमॉल/ BVG च्या खासगी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर वाहनांना जामर लावणे, वाहने टो करणे, नो पार्किंग चे दंड वसूल करणे ही ट्रॅफिक पोलीस विभागाची कामे करण्याची परवानगी कोणी दिली ?