गावगाथाठळक बातम्या
Chikhali fire : चिखली येथील भंगार गोदामाला भिषण आग

निगडी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवडच्या चिखलीमध्ये पुन्हा एकदा गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी महानगरपालिकेची नऊ अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट दिसत असल्याने ही आग मोठी असल्याचं बोलले जात आहे. चिखलीत अनेक अनाधिकृत गोडाऊन आहेत.

भंगानिगडीर व्यावसायिकांवर कारवाई करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. परंतु, चिरीमिरीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी अनाधिकृत आणि बेकायदेशीर गोडाऊनवर कारवाई करत नसल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे.
