गावगाथा

प्रमोद शिंदे यांचे 41 वे यशस्वी रक्तदान

रक्तदान

प्रमोद शिंदे यांचे 41 वे यशस्वी रक्तदान

HTML img Tag Simply Easy Learning    

कल्याण :(सुनिल इंगळे ) रक्तदानाने अनेकांना,गरजु रुग्णांना जीवदान मिळते.मागील 30 वर्षांपासून श्री प्रमोद शिंदे नियमित रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करतात .याबरोबरच स्वतः योग करून निरंतर योग प्रचार,प्रसार करत असतात.वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्य सुदृढ रहावे यासाठी त्यांचा हा प्रयत्न निश्चितच गौरवास्पद आहे. श्री प्रमोद शिंदे हे जिल्हा परिषद शाळा लतीफवाडी ता.शहापूर येथे शिक्षक असून त्यांनी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे भव्य दिव्य रक्तदान कार्यक्रमात 41वे यशस्वी रक्तदान पार पाडले. या अगोदर ते योग रेपरी, योग पंडित योगाचार्य आदी किताबांनी ते सन्मानित झाले आहेत. आवडीच्या या विशेष कार्याबद्दल पतंजली योग समिती कल्याणचे ज्येष्ठ मान्यवर श्री.सतीश मुळावेकर, समाजसेवक,पत्रकार व बहिणाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील इंगळे, शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील तसेच मा.आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button