जगातील पहिलाच एआय लिखित ‘विनर्स दिवाळी अंकास मराठीबोलीचा पहिला क्रमांकचा पुरस्कार…
दिवाळी अंक स्पर्धा

जगातील पहिलाच एआय लिखित ‘विनर्स
दिवाळी अंकास मराठीबोलीचा पहिला क्रमांकचा पुरस्कार…
पुणे — ‘विनर्स’ दिवाळी अंकाचे दखल पुण्यातील मराठीबोली संख्येने घेतला असून विभागून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे.मराठीबोली पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राजकीय दिवाळी अंक स्पर्धेत एकंदरीत २३४ प्रवेशिका आल्या होत्या साहित्यिक शरद अत्रे आणि श्रीपाद टेंबे यांनी ३४ दिवाळी अंकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.३९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ ते ५ यावेळी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज डेक्कन पुणे येथे पुरस्कार वितरण समारंभ होईल अशी माहिती मराठीबोली संस्थेचे संस्थापक परमेश्वर उमरदंड, अध्यक्ष शिवाजी भापकर यांनी दिली आहे
आजच्या काळापुढील सर्वात मोठे आव्हान आणि तितकीच मोठी संधी म्हणून याकडे पाहिले जात आहेत ते म्हणजे ए आय तंत्रज्ञान. अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून ‘विनर्स’ या दिवाळी अंकाने एक वेगळाच प्रयोग करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगातील पहिलाच एआय लिखित दिवाळी अंक अशी जाहिरात करून हा दिवाळी अंक वाचकांच्या समोर सादर झाला आहे. हार्ट पब्लिकेशनचे विनोद शिंदे यांनी संपादक म्हणून हे धाडसी पाऊल उचलले आहे.
