अॅड केशव इंगळे हार्दिक अभिनंदन.
अखिल भारतीय ढोर कक्कय्या समाज मंडळ श्री क्षेत्र कक्केरी (जि) बेळगाव विश्वस्त कमिटी वर सोलापूर ढोर समाजाचे तडफदार नेते अॅड केशव इंगळे यांची घवघवीत मताधिक्याने निवड.सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर तर्फे हार्दिक अभिनंदन.
कक्केरी दि:-८-कक्केरी येथे क्षेत्र कक्केरी कक्कय्या ढोर समाजाचे आद्य गुरू वचन रक्षक बसवेश्वर क्रांती चळवळीचे सरसेनापती गनिमी पध्दतीने प्रस्तापित समतेचे विरोधक प्रतिगामी शक्ती विरोधी क्रांती लढ्यात धारातीर्थी पडलेले कक्कय्या महाराज यांचे कक्केरी येथे भव्य स्मारक,उद्योग नगरी, ग्रंथालय, विद्रोही साहित्य संग्रह,प्रयोगशाळा, शिक्षण संस्था, विश्राम शाळा अशा गोष्टी नी सज्ज बहुउद्देशीय प्रचंड मोठे स्मारक बांधण्यासाठी ढोर समाजाची अखिल भारतीय पातळीवरील समाजाला तन मन धनाने एकत्र करून ढोर समाजाची काशी सम असे स्मारक तयार केलेल्या अशा ऐतिहासिक समितीवर सोलापूरचे तडफदार व सुशीलकुमार शिंदे साहेबांचे उजवे हात समजले जाणारे अॅड केशव इंगळे यांची कक्केरी येथे झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत घवघवीत मताधिक्याने निवड झाली आहे. त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी सुशील विचारधारा संस्था व ढोर समाज बांधवांकडुन शुभेच्छा..
अॅड. केशव इंगळे यांची गरीब कुटुंबातून जन्म घेऊन बी ए आॅनर्स, एम एस डब्ल्यू,एम ए, एल एल बी,एल एल एम शिक्षण संपादन केलेले उच्च विद्याविभूषित.उत्कृष्ट वक्तृत्व, तळागाळातील लोकात सर्व समाजात विशेषतः दलित कष्टकरी समाजात मिसळून कांग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहून ढोर समाजाचे समाज शिरोमणी देशाचे माजी गृहमंत्री लोक सभागृह नेते सुशीलकुमार शिंदे साहेबांचे हात मजबूत करीत आहेत. कांग्रेस पक्षाचे काम करत असताना कांग्रेस पक्षाचे माध्यमातून अनेक राजकीय कमिट्यावर काम करत त्यांच्या अनुभव विश्वाचा फायदा कांग्रेस पक्षाला झाला आहे.
अॅड. केशव इंगळे यांनी सोलापूर महानगरपालिका परिवहन चेअरमनपद सुध्दा भूषवून कर्तृत्वाचा तुरा शिरोभुषण खोवला गेला आहे.
ते सुशील विचारधारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर चे सद्या कार्याध्यक्ष आहेत.
राजकारण, समाजकारणात कार्यरत असताना उपजीविकेसाठीआपला स्वतः चा वकिली व्यवसाय सांभाळत आहेत.
अॅड. केशव इंगळे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा
Back to top button
×
No WhatsApp Number Found!