गावगाथाठळक बातम्या
Pune : लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय ‘पत्रकारत्न’ पुरस्कार जाहीर

पुणे (प्रतिनिधी): लोकशाही वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय ‘पत्रकारत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सोळाव्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी भांगे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

मुळचे अक्कलकोट तालुक्यातील किरनळी गावचे सुपुत्र चंद्रशेखर भांगे हे पुण्यात ‘लोकशाही’ या मराठी वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम करत असून, त्यांनी केलेल्या अनेक बातम्यांना अनेक विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत…
