
सोलापूरकरांचे महापालिका विरोधात आंदोलन .. !!!
————-

प्रतिनिधी,
संपूर्ण सोलापूर शहरात उद्भवणाऱ्या कचऱ्याच्या आणि आरोग्याच्या समस्येवर आज मार्ग फौंडेशन च्या वतीने मार्ग फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शना खाली आणि जिल्हा समन्वयक संतोष राठोड यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे शेकडो नागरिकांसह आंदोलन करण्यात आले यावेळी महापालिका सेवा विरोधी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला, यावेळी पत्रकांशी बोलताना मार्ग फौंडेशन चे समन्वयक अविनाश इंगळे म्हणाले कि …
” सोलापूर शहरात कचऱ्याची समस्या अतिशय भीषण होत असून त्यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाहीये, शहरात सर्वत्र उघड्यावर कचरा साचलेला दिसतो आहे, वेळेवर घंटागाडी परिसरात जात नाही. अनेक भागातील नागरिकांनी या बद्धल मार्ग फौंडेशन कडे तक्रारी केले होते त्यानुसार अनेक वेळा प्रशासनाला निवेदन देऊन त्यावर कारवाई केल्याचं दिसत न्हवते त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या आदेशानुसार आज आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्वी महापालिका प्रशासनास अनेक वेळा तोंडी आणि लेखी निवेदने देऊनही समस्या सुटत नसल्याने आज सोलापूरकरांना आंदोलन करण्याची वेळ आली ,
या वेळी मार्ग फाउंडेशन मार्फत सदर आंदोलना संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेलीउगले पाटील याना निवेदन देण्यात आले असून मा. आयुक्तांनी या समस्येवर लवकरात लवकर सोलापूरकरांसाठी तोडगा काढून समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे,

या नंतरही महापालिका प्रशासन या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन उपाय योजना करणार नसेल तर या पुढे महापालिकेवर प्रचंड जनसंख्येचा आक्रोश मोर्चा नाईलाजाने बेधडकपणे न्यावा लागेल ..
यावेळी मार्ग फौंडेशन च्या महिला प्रमुख श्रद्धा गायकवाड , समन्वयक अमोल कांबळे, अविनाश इंगळे, ममता कुलकर्णी टिकेकर, वैशाली देशपांडे, रेणू गोरे, बाबासाहेब माने (सरपंच), अमोल कांबळे, नवनाथ जाधव, अहमद कोतवाल, संतोष गायकवाड, अजय चव्हाण, आसीफ यत्नाल, अनिल पवार, निखिल सगट, दिलीप पवार ई. मार्ग फाऊंडेशन चे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते व सोलापुरातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, मार्ग फाउंडेशनच्या या आंदोलनात सर्वात जास्त महिलांचा सहभाग होता हे वैशिष्ठ्य
