शिवबा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने फुलेनगर आर टी ओ लगत स्व. सुवर्णा (काकु) भारतजी सावंत पाणपोईने तप्त उन्हामध्ये थंड पाण्याचा गारवा..!
सामाजिक बांधिलकी

शिवबा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने फुलेनगर आर टी ओ लगत स्व. सुवर्णा (काकु) भारतजी सावंत पाणपोईने तप्त उन्हामध्ये थंड पाण्याचा गारवा..!

शिवबा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने फुलेनगर आर टी ओ लगत स्व. सुवर्णा (काकु) भारतजी सावंत पाणपोई सुरू असून याचा लाभ हजारो नागरिक घेतात. आळंदी रस्त्या लगत असल्याने माऊली दर्शनाला जाणारा प्रत्येक भाविक याठिकाणी विसावा घेऊन थंड पाणी पिऊन तृप्त होतो. वाटसरू, वाहन चालक, शाळकरी मुले, नोकरदार माणसे, एवढेच नव्हे तर पक्षी सुध्दा येऊन या पाणपोई वर आपली तहान भागवतात. पक्षानं करीता सुध्दा येथे सोय करण्यात आली आहे.
अतिशय उत्तम प्रकारे या पाणपोई ची देखभाल व निगा प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. सतिश भाऊ सावंत व त्यांचे सर्व सहकारी राखतात. डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी चौक या आळंदी रस्तावर एकमेव अशी हि उत्तम पाणपोई उभारण्यात आली आहे. सर्व नागरिकांकडून याचे कौतुक करण्यात येत आहे..
