स्वामी चरित्रावर आधारित शाहीर आझाद नाईकवाडी यांचे वटवृक्ष मंदिरात पोवाड्यांचे सादरीकरण
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पोवाडे सादर करताना शाहीर आझाद नाईकवाडी व सहकारी दिसत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात शाहीर आझाद नाईकवाडी व सहकाऱ्यांचा सत्कार करताना महेश इंगळे, सागर महाराज देशमुख दिसत आहेत.

स्वामी चरित्रावर आधारित शाहीर आझाद नाईकवाडी यांचे वटवृक्ष मंदिरात पोवाड्यांचे सादरीकरण

(प्रतिनिधी अक्कलकोट, ) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शाहीर विशारद डॉ.आझाद नाईकवाडी व सहकाऱ्यांनी स्वामी चरित्रावर आधारित पोवाडे सादरीकरण करून स्वामी भक्तीचे अनोखे सादरीकरण केले. या कार्यक्रमात त्यांना शाहीर श्रद्धा जाधव, गायिका जान्हवी कांबळे, गायिका आरती कांबळे,
विक्रम परीट (ढोलकी), भार्गव कांबळे,
(संबळ), ओंकार सुतार (संगीत संयोजक),
रमेश सुतार (ध्वनि व्यवस्था) आदींनी उत्तम साथ संगत केली. यावेळी उपस्थित स्वामी भक्तांनी या कार्यक्रमाचा आनंद घेऊन शाहीर आझाद नाईकवाडी यांच्या अनोख्या स्वामी भक्तीचे कौतुक केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीचे ज्योतिषाचार्य ह.भ.प.सागर महाराज देशमुख (वकील) आळंदीकर यांनी शाहीर आझाद नाईकवाडी व डॉ.मनीषा नाईकवाडी व सहकाऱ्यांचे श्री स्वामी समर्थांचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, विपुल जाधव, श्रीकांत मलवे,
शाहीर युवराज पुजारी, युवा गायक नितेश साठे, युवा शाहीर स्वराज नायकवाडी, बालाशाहीर पौरस नायकवाडी, आदींसह अनेक भाविक भक्त सहभागी होवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पोवाडे सादर करताना शाहीर आझाद नाईकवाडी व सहकारी दिसत आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात शाहीर आझाद नाईकवाडी व सहकाऱ्यांचा सत्कार करताना महेश इंगळे, सागर महाराज देशमुख दिसत आहेत.
