गावगाथा

वागदरीत सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन

वाढदिवस विशेष

वागदरीत सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन 

वागदरी, ता. अक्कलकोट
सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त माजी. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता वागदरी येथील बसस्थानक परिसरातील बाजारपेठ येथे गरजू आदिवासी व गोरगरीब मुलांसाठी “कपडे वाटप” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या सामाजिक जाणिवेतून आणि सहृदयतेतून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यंदा आदिवासी भागातील गरीब व गरजू मुलांना उपयोगी ठरेल अशा नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचे आयोजन शाम बाबर – अध्यक्ष, सागरदादा कल्याणशेट्टी युवा मंच, वागदरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून या कार्यात स्थानिक तरुण कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
कार्यक्रमाची सविस्तर माहिती:
  • दिनांक: बुधवार, ६ ऑगस्ट २०२५
  • वेळ: सकाळी ११.०० वाजता
  • स्थळ: प्रणवंगण बाजारपेठ, वागदरी, ता. अक्कलकोट
  • संपर्क: 9637580276
सदर उपक्रमामुळे गरजू मुलांना आधार मिळणार असून सागरदादा यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
–– 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button