गावगाथा
वागदरीत सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन
वाढदिवस विशेष

वागदरीत सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना कपडे वाटप कार्यक्रमाचे आयोजन
वागदरी, ता. अक्कलकोट –
सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त माजी. श्री. सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता वागदरी येथील बसस्थानक परिसरातील बाजारपेठ येथे गरजू आदिवासी व गोरगरीब मुलांसाठी “कपडे वाटप” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या सामाजिक जाणिवेतून आणि सहृदयतेतून दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यंदा आदिवासी भागातील गरीब व गरजू मुलांना उपयोगी ठरेल अशा नवीन कपड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचे आयोजन शाम बाबर – अध्यक्ष, सागरदादा कल्याणशेट्टी युवा मंच, वागदरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून या कार्यात स्थानिक तरुण कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
कार्यक्रमाची सविस्तर माहिती:
-
दिनांक: बुधवार, ६ ऑगस्ट २०२५
-
वेळ: सकाळी ११.०० वाजता
-
स्थळ: प्रणवंगण बाजारपेठ, वागदरी, ता. अक्कलकोट
-
संपर्क: 9637580276