जिल्हा परिषद प्राथमिक मराठी, कन्नड, शाळा वागदरी येथे शाळेतील विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप
युवा उद्योजक श्री प्रकाश मंगाणे यांचे सामाजिक कार्य आदर्श घेण्यासारखे : कमलाकर सोनकांबळे
अक्कलकोट प्रतिनिधी
वागदरी गावचे सुपुत्र युवा उद्योजक श्री प्रकाश चंद्रकांत मगाणे यांच्या कडुन जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा व कन्नड शाळा वागदरी येथे शाळेतील विद्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, गरीब मुलींना शालेय बॅग व सर्व मुलींना वही पेन पेन्सिल वाटप श्री प्रकाश मंगाणे यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगाव गावचे उपसरपंच श्री कमलाकर सोनकांबळे यांनी भूषविले ,सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्री सुनील सावंत व श्री शिवशरणप्पा सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमांची प्रस्तावना कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री बसवराज मुनोळी यांनी केले
यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की, प्रकाश मंगाणे यांनी उद्योग क्षेत्रात काम करत करत राजकारण सोबत सामाजिक काम उल्लेखनीय आहे ज्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन एवढे प्रगती करून देखील गावाच्या मातीचे व शाळेचे नाळ जोडलेले व्यक्ती महत्व आहेत वंचित घटकातील गरीब मुलं शिक्षण पासून वंचित राहू नये यासाठी त्याचे धडपड कौतुकास्पद आहे
कार्यक्रमास प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य श्री शिवराज पोमाजी ( मंत्री ) , श्री विरभद्र मंगाणे, श्री अशोक पोमाजी, सर श्री बिराजदार सर, श्री रवी पोमाजी, श्री सिध्दु कोळी, श्री महादेव सोनकवडे ,श्री विरभद्र पुरत, टायगर ग्रुप अध्यक्ष श्री शरण माशाळे, श्री उमराणे, श्री चिनमगीरी, मराठी मुलींची शाळेलतील मुख्याध्यापक सौ सोनकवडे, मॅडम सौ कलशेट्टी मॅडम, सौ कुणाले मॅडम, श्री बागवान सर, सर्व प्रमुख अतिथी यांचे शाळे तर्फे यथोचित असा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कन्नाड शाळेतील मुख्याध्यापक बसवराज मुनोळी सर, श्री शिवानंद गोगाव सर, श्री परमेश्वर मुनोळी सर, नागेंद्र बिराजदार सर, श्री शिवशंकर बिराजदार सर, श्री सिध्दाराम होदलूरे सर, श्री प्रशांत हत्तरकी सर ,सौ. जयश्री मुनोळी मॅडम, श्री स्वामी सर, परिश्रम घेतले सुत्रसंचलन श्री शिवानंद गोगाव सर यांनी केले आभार श्री परमेश्वर मुनोळी सर यांनी मानले
Back to top button
×
No WhatsApp Number Found!