गावगाथा

युवा धावपटू अरूण राठोडला आर्थिक मदती साठी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे ;अक्कलकोटच्या ‘अरुण राठोड’चा पुण्यात डंका ; सकाळ आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत अव्वल

_अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावच्या सुपुत्राची यशोगाथा_

युवा धावपटू अरूण राठोडला आर्थिक मदती साठी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे ;अक्कलकोटच्या ‘अरुण राठोड’चा पुण्यात डंका ; सकाळ आयोजित हाफ मॅरेथॉन स्पर्धेत अव्वल

_अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावच्या सुपुत्राची यशोगाथा_

_प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीने ग्रामीण भागातील धावपटू अरूण राठोड यांनी घातली यशाला गवसणी …_

अक्कलकोट (प्रतिनिधी): ‘सकाळ’ आयोजित केलेल्या पाचव्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचा ‘अरुण राठोड’ याने पुरुषांच्या २१ किलोमीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

यंदाच्या हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत ब्राँझपदक जिंकणाऱ्या सोलापूरच्या अरुण राठोडने आघाडी घेण्यास सुरुवात केली. शेवटचे दोन किलोमीटर शिल्लक असताना अरुणने वेग वाढविला. त्यापाठोपाठ विवेकनेही वेग वाढविला व येथेच त्याचे डावपेच चुकले.,ही कबुली त्याने शर्यत संपल्यानंतरही दिली. तो म्हणाला, येथे वेग न वाढविता त्याच्या मागे धावण्याचे धोरण ठेवले असते तर निकाला वेगळा लागला असता. अखेर २४ वर्षीय अरुणने केवळ तीन सेकंदाच्या फरकाने विवेकला मागे टाकत प्रथमच विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम शर्यत पूर्ण करताच अरुणचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

चौकट — पुण्यात स्पर्धेत धावताना नेहमीच उत्साह असतो. आज धावपटूंसाठी पोषक वातावरण होते. या स्पर्धेत प्रथमच धावत असल्याने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात विजेतेपद मिळाल्याचा आनंद वेगळा आहे.
अरुण राठोड विजेता, २१ कि.मी.

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद तांडा गावचा सूपुत्र अरूण धानसिंग राठोड २४ वर्षिय धावपटुने अतिशय कठिण समजल्या जाणार्या विविध मॅरेथॉन स्पर्धा मध्ये अव्वल नंबर पटकावुन अक्कलकोट तालुक्याच नांव नव्या शिखरावर नेले आहे संसाधनांचा अभाव, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले,आईन मोलमजुरी पालनपोषण केले अशा परिस्थितीत खचून न जाता घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही खसून न जाता काबाडकष्ट करून फावल्या वेळात सराव करून त्यांने मिळविलेले यश व्दिगुणित असे आहे.
अरूण धानसिंग राठोड २४ वर्षांचा तरुण बी.ए.शिक्षण घेतलेला धावपटू त्याला लहानपणापासून धावण्याची आवड होती ही आवड सातवी असल्या पासून धावण्याच्या सराव करतोय शाळेत असताना महाबुले सरांनी मोलाचं मार्गदर्शन मिळाले व पुढील काळात तालुका,जिल्हा व राज्य स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन यशस्वीरीत्या गाजवली त्यानंतर अरूण राठोड यांनी मागे वळून पाहिले नाही
चांलू वर्षांत २०२४ मध्ये देशपातळीवर विदेशात विविध स्पर्धांचे आपल्या यशाचा डंका वाजवला आहे जून २०२४ मध्ये ४ चौथ्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा गुवाहाटी आसाम येथे १० हजार कि.मी प्रथम क्रमांक पटकाविला आहे, जून २०२४ मध्ये ऑल इंडिया इंटर विद्यापीठ चेन्नई येथे स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा बक्षीस मिळाले आहे, बंगलोर कर्नाटक येथे ६३ व्वा नॅशनल ओपन ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत १० हजार कि.मी.दुसरा क्रमांक पटकाविला आहे तसेच १७ व्वा एशियन क्रास कंट्री चॅम्पियनशिप मेन्स सिनियर हाँगकाँग येथे झालेल्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे याचं स्पर्धेत सांघिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
लहान वयात अरूण मॅरेथॉन स्पर्धा मध्ये आपली वेगळी ख्याती ओळख निर्माण केली आहे. अरूणचे हे मॅरेथॉन स्पर्धांमधील यश डोळे दिपावणारे असले तरी धावण्यासाठी संतुलन आहार, धावण्यासाठी आवश्यक असे महागडे स्पोर्ट शूज विविध मॅरेथॉन स्पर्धेत सहभागासाठी भरावी लागणारी प्रवेश फि यासाठी लागणारे पैसे याची कमतरता त्याना जाणवत असते,त्यांची घरची परिस्थिती बिकट आहे,आई मोलमजुरी करणारी असल्याने सतत अरूण ला आर्थिक चणचण भासत असते यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दानशूर लोकांनी किंवा संस्थांनी पुढे येऊन अरूण धानसिंग राठोड या तरूण धावपटूला सहकार्य करावे.
तरूण धावपटूला वेळीच मदतीचा हाथ दिला तर अक्कलकोट तालुक्याचे नांव उज्वल करेल यांत शंका नाहीं…

Arun Dhansing Rathod
Bank of India
Account no- 073818210003637
IFSC code BKID0000738
GPay phonepe Paytm :-9923583902

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button