गावगाथा

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले न्यासाची कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे, या ठिकाणी देवत्वाची अनुभूती व संस्कृतीची जपणूक केली जातेय — प्रसिध्द उद्योगपती पुनीत बालन

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले न्यासाची कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे, या ठिकाणी देवत्वाची अनुभूती व संस्कृतीची जपणूक केली जातेय — प्रसिध्द उद्योगपती पुनीत बालन

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले न्यासाची कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे, या ठिकाणी देवत्वाची अनुभूती व संस्कृतीची जपणूक केली जात असल्याचे मनोगत पुण्याचे प्रसिध्द उद्योगपती व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यांच्या समवेत पत्नी सौ.जान्हवी पुनीत बालन-धारीवाला, शिवाजी मराठा सोसायटी पुणेचे मानद सचिव, अखिल मंडई पुणेचे व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ आण्णा थोरात, सौ.सुचिता आण्णा थोरात, जान्हवी शहा-थोरात, प्रीतम शहा, राजेश करळे, प्रसाद माने, तुषार शिंदे, संजय पाटील, पुनीत बालन यांचे स्विय सहायक मनोज दिवटे, अक्षय जाधव, महेश चिलळकर, राम काजळे, बाळू पाटोळे, सचिन पाटील, जीनेश गावडे, जालिंदर लगड, नितीन महाजन, प्रकाश बुधवंत, सचिन कारले, अभिजित डावरे हे उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुढे बोलताना पुनीत बालन म्हणाले कि, दररोज महाप्रसाद सेवेबरोबरच श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील २२२ निराधार, अंध व दिव्यांग यांना दोन वेळेचे जेवण घरपोच दिले जाते, त्या माध्यमातून घडणारी ईश्वर सेवा असून, नूतन महाप्रसाद गृह उभारणीचा निर्णय म्हणजे दूरदृष्ठी असल्यानेच न्यासाची प्रगती दिसत असल्याचे बालन म्हणाले. यावेळी पुनीत बालन यांनी न्यासाच्या परिसरात उभारलेल्या विविध उपक्रमाची पाहणी केले. कमीतकमी जागेत भक्तांना जास्तीजास्त सोयी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, मनोज निकम, पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, प्रथमेश पवार, वैभव मोरे, शुभम चव्हाण, विक्की जाधव, शरद पवार, दिनेश बंडगर, विश्वजित सावंत, सागर जाधव, मैन्नुधीन कोरबू, विशाल कलबुर्गी, श्री चव्हाण, किरण साठे, नामा भोसले, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, शरद भोसले, संभाजीराव पवार, चंद्रकांत हिबारे, सागर याळवार, श्रीकांत इचगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button