गावगाथा

स्वामी भक्तीतून मिळणारे परमार्थाचे बोध हे शाश्वत सुखाचे साधन – डॉ.भारतीताई पवार

डॉ.भारतीताई पवार यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

स्वामी भक्तीतून मिळणारे परमार्थाचे बोध हे शाश्वत सुखाचे साधन – डॉ.भारतीताई पवार

(प्रतिनिधी अक्कलकोट, 
आजच्या युगात माणसाचे जीवन कितीही प्रगतशील झाले असले तरी तो अध्यात्माची कास धरून परमार्थाचे बोध घेण्याकरिता सदैव प्रयत्नशील असतो. आध्यात्म आणि धर्मस्थळांव्यतीरीक्त त्याला परमार्थ अपूर्ण वाटते. अशावेळी माणसाने स्वामी भक्तीत यावे. याकरिता मी या भाविकांना एवढेच सांगू इच्छितो की या भाविकांनी स्वामीभक्तीत व त्यांच्या नित्य स्मरणात जीवन व्यतीत करावे. जीवन म्हटले की प्रत्येकाचे स्वार्थ परमार्थ आलेच. त्या त्या कर्मानुसार स्वामी आपल्या भाविकांना त्यांच्या कार्याची प्रचिती देत असतात. परंतू स्वामींची प्रचिती ही नेहमी फलदायीच असते. याकरिता भाविकांनी स्वामींचे स्मरण ठेवून स्वामी भक्ती करीत जीवनातील स्वार्थ परमार्थाचा सांगड घालावा. कारण या स्वामी भक्तीतून मिळणारे परमार्थाचे बोध हेच जीवनातील शाश्वत सुखाचे साधन आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा केंद्रीय आदिवासी मंत्री डॉ.भारतीताई पवार
यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.भारतीताई पवार यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी डॉ.भारतीताई पवार बोलत होत्या. पुढे बोलताना डॉ.भारतीताई पवार यांनी वटवृक्ष मंदिरात सुशोभीकरण झाल्याने मंदिरातील पावित्र्य व प्रसन्नता आणखीन वाढलेले आहे. या पवित्र व प्रसन्नतेतून भाविकांच्या मुखातून स्वामी भक्तीचा झरा आणखीन मोठ्याने ओसरत आहे याचे सर्व श्रेय मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या ठायी आहे. असेही मनोगत डॉ.भारतीताई पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, बसवराज कोळी, ननु कोरबू, नागेश कुंभार, लखन झंपले, खाजप्पा झंपले, संतोष जमगे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, विपुल जाधव, सागर गोंडाळ, चंद्रकांत कवटगी, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.भारतीताई पवार यांचा
देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button