
अक्कलकोट तालुक्यातून बुद्धीबळ मध्ये प्रथम क्रमांक
कु ओजस्वी अमोल बोराळे..

बुद्धिबळ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी आपले वर्चस्व कायम ठेवले.. जिल्हा स्तर साठी निवड करण्यात आली आहे..जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वागदरी विदयार्थीनी ची सुयश..
अक्कलकोट तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे साहेब यांच्या हस्ते प्रमाणापत्र व विजेता मेडल देण्यात आले.. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन व सध्याचे विद्यमान संचालक श्री वीरभद्र यादवाड सर प्रमुख उपस्थिती होते तसेच केंद्रप्रमुख शिवाजी शिंदे साहेब केंद्र प्रमुख धडके साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले….
या यशा निमित्त वागदरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बसवराज मुनोळी साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बनसोडे साहेब व शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गजानन परमेश्वर सुरवसे यांनी पण तिचे कौतुक करून अभिनंदन केले.. व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या…

