कल्याणशेट्टी महाविद्यालयास विद्यापीठ परीक्षा विभाग प्रमुख डॉ श्रीकांत अंधारे यांची सदिच्छा भेट..
सदिच्छा भेट

कल्याणशेट्टी महाविद्यालयास विद्यापीठ परीक्षा विभाग प्रमुख डॉ श्रीकांत अंधारे यांची सदिच्छा भेट..

अक्कलकोट

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेच्या मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयात विद्यापीठ नियमानुसार परीक्षा विभागाचे कामकाज कार्यान्वित असून ते समाधानकारक आहे असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे यानी व्यक्त केले.

मातोश्री गुरुबसवा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील परीक्षा विभागाने आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते डॉ अंधारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समन्वयक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ एस आर लोखंडे, शिक्षक राजकुमार गवळी, सुरेश रुगे, सिद्रामप्पा पाटील आदी उपस्थित होते.

डॉ अंधारे यांनी महाविद्यालयातील डार्क रूम, परीक्षा हॉल, कॅप सेंटर, पर्यवेक्षक दालन आदींचे निरीक्षण केले. महाविद्यालयाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, विनाअनुदानित महाविद्यालय असून देखील अत्यंत शिस्तीत व सुव्यवस्थेत परीक्षा सुरू असल्याबद्दल त्यांनी व्यवस्थापन परिषदेस धन्यवाद दिले.

चौकटीतील मजकूर
विद्यापीठाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करणार,
विनाअनुदानित महाविद्यालयांना सुविधांचा अभाव असतो, तरीदेखील ते विद्यापीठाला सहकार्य करतात, त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ दिली जाणार नाही. सर्व प्रकारच्या सुविधा देऊन सहकार्याची भूमिका घेऊ असे विद्यापीठ परीक्षा प्रमुख डॉ अंधारे यांनी याप्रसंगी सांगितले.
फोटो परिचय
कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या वतीने मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना डॉ श्रीकांत अंधारे व मान्यवर