रांगोळीकार शिक्षक विश्वनाथ पांचाळ, सुलेखनकार शिक्षक रत्नकांत विचारे व शिक्षक संतोष साखरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
रांगोळीकार

रांगोळीकार शिक्षक विश्वनाथ पांचाळ, सुलेखनकार शिक्षक रत्नकांत विचारे व शिक्षक संतोष साखरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

वर्ल्ड युनिटी कमिशन यू.एस ए यांच्या वतीने आज अचीवर कॉलेज कल्याण या ठिकाणी क्रांतीज्योती महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार गांधी बाल मंदिर हायस्कूल मधील रांगोळीकार, एन सी सी ऑफिसर शिक्षक विश्वनाथ पांचाळ, सुलेखनकार शिक्षक रत्नकांत विचारे तसेच सुप्रसिद्ध गायक शिक्षक संतोष साखरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आज सन्मानीत करण्यात आले. शाळेतील शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी या तिघा शिक्षकांचे तोंड भरून कौतुक करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं आहे.याआधी देखील यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
