ठळक बातम्या
Akkalkot : के.एल.ई. संचलित मंगरूळे प्रशालेचा आर्यन बारसकर ९७.४० % गुण मिळवून अक्कलकोट तालुक्यात प्रथम ; गावगाथा न्यूज नेटवर्क कडून विशेष अभिनंदन

अक्कलकोट (प्रतिनिधी) : सोमवार (दि.२७ मे) रोजी इयत्ता दहावी चा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये के.एल.ई. संचलित मंगरूळे प्रशालेचा कु. आर्यन योगेश बारसकर ९७.४० % गुण मिळवून अक्कलकोट तालुक्यात प्रथम तसेच

कु. साकार संतोष तोळणूरे हा ९७ % गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे .

विषेश म्हणजे साकारने विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहे.


प्रशालेत एकूण २६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते . त्यापैकी सर्वच्या सर्व २६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल १००% लागला आहे.
९० % पेक्षा अधिक – ३५ विद्यार्थी
७५% पेक्षा अधिक – १४८ विद्यार्थी
६० % पेक्षा अधिक – ६५ विद्यार्थी .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गावगाथा न्यूज नेटवर्क कडून विशेष अभिनंदन….