ज्योतिष शास्त्र व वास्तु विशारद डॉ.शरद आहेर यांनी घेतले सहकुटुंब स्वामींचे दर्शन.
नूतन वर्षाचे औचित्य साधून स्वामींचे दर्शन घेत व्यसनमुक्त भारताचा सोडला संकल्प.

ज्योतिष शास्त्र व वास्तु विशारद डॉ.शरद आहेर यांनी घेतले सहकुटुंब स्वामींचे दर्शन.

नूतन वर्षाचे औचित्य साधून स्वामींचे दर्शन घेत व्यसनमुक्त भारताचा सोडला संकल्प.

(अक्कलकोट, दि.१०/०१/२५)
……श्रीशैल गवंडी……

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतचे रहिवासी व देशातील सुप्रसिद्ध ज्योतिष शास्त्र व वास्तु विशारद डॉ.शरद आहेर यांनी नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन सहकुटुंब श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.शरद आहेर व कुटुंबीयांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना डॉ.शरद आहेर यांनी आपला जन्म हा अमेरिका, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया इत्यादी पाश्चात्य व पौर्वात्य खंडात झाला नसून तो पवित्र भारत मातेच्या भूमीवर झालेला आहे. साधू संतांची व महात्म्याची ही भारतभूमी आहे. या भारत भूमीवर श्री.स्वामी समर्थ महाराजांची थोर महिमा आहे. यामुळे या वर्षात व्यसनी नागरिकांना स्वामींनी सद्बुद्धी द्यावी, व्यसनमुक्त व निरोगी भारत घडावा याकरिता आज येथील श्री वटवृक्ष स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींच्या चरणी व्यसनमुक्त भारताचा संकल्प सोडला असल्याचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी महेश इंगळे यांच्यासह मंदिर समितीच्या मान्यवरांना व सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.शरद आहेर यांचा सपत्नीक श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे दिसत आहेत.
