गावगाथाठळक बातम्या

देशातील सर्वाधिक लांबीचा दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग आपल्या सोलापूरमधून… सोलापूरसह कोण-कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार हा मार्ग, कसा असणार रूट?

(प्रतिनिधी ): गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात देशात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रातही रस्त्यांचे विविध प्रकल्प मार्गे लागले आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते कनेक्टिव्हिटी देखील गेल्या काही वर्षांमध्ये सुधारली आहे.

भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग हा आपल्या महाराष्ट्रातून जातो तसेच देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग देखील आपल्या महाराष्ट्रातूनच जात आहे.

 

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे 1350 KM लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला टक्कर देण्यासाठी भारतात आणखी एक मोठा महामार्ग उभारला जात आहे. सुरत चेन्नई महामार्ग हा देशातील सर्वाधिक लांबीचा दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग असून हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जातो.

 

सध्या या महामार्ग प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुंबई दिल्ली महामार्ग हा भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जात असून याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते दिल्ली दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. हा मार्ग देशातील सात राज्यांना जोडतो आणि यामुळे मुंबई ते दिल्ली दरम्यान चा प्रवास अवघ्या बारा तासात पूर्ण होणार आहे. सध्या या दोन महानगरादरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 24 तासांचा वेळ लागतो.

 

म्हणजेच मुंबई दिल्ली महामार्गचे काम पूर्ण झाल्यानंतर या प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होणार आहे. सुरत चेन्नई महामार्ग बाबत बोलायचं झालं तर हा 1271 किलोमीटर लांबीचा महामार्ग. हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग, या महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावणार आहेत.

 

भारताच्या दक्षिण टोकाला पश्चिमेशी जोडण्यासाठी हा महामार्ग उभारला जात आहे. या महामार्गाच्या उभारणीनंतर सुरत ते चेन्नईदरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासातला हातभार लागणार आहे. कारण की, भारताच्या दक्षिण टोकाला पश्चिमेशी जोडणाऱ्या या महामार्गाचा कनेक्टींग पाईंट महाराष्ट्रात आहे.

म्हणजेच सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेचा मध्यबिंदू महराष्ट्रात आहे. सहा राज्यांमधील अनेक शहरे या महामार्गामुळे कनेक्ट होणार आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातुन हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असल्याने समृद्धी महामार्ग प्रमाणेच याही महामार्गाचा या भागाला फायदा होणार आहे.

 

या महामार्ग प्रकल्पाच्या उभारणीनंतर सुरत ते चेन्नईदरम्यानचे अंतर 1600 km वरून 1270 किलोमीटरवर येणार आहे. म्हणजेच या दोन्ही महानगरांमधील 330 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. सध्या सुरत ते चेन्नईदरम्यान प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना 30 तासांचा वेळ लागतो मात्र जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी 18 तासांवर येणार आहे.

 

महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या महामार्गाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर कर्नाटक आणि तेलंगणामधील कुर्नूल, आंध्र प्रदेशमध्ये या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. 2025 मध्ये येथील रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कुर्नूलच्या पलीकडे, या एक्स्प्रेसवेमध्ये ब्राउनफील्ड अपग्रेडेशनचा समावेश आहे, ज्याचे काम सध्या चालू आहे.

तसेच महाराष्ट्राबाबतीत बोलायचे झाल्यास अहिल्या नगर आणि अक्कलकोट दरम्यान या महामार्गाच्या 234.5 किमी ग्रीनफिल्ड विभागाला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली आहे. NHAI ने एक्सप्रेसवेच्या या भागासाठी बांधकाम निविदा देखील मागवल्या आहेत. यामुळे या भागाचे लवकरच काम सुरू होणार आहे. तसेच, या एक्सप्रेसवेचे सुरत ते अहिल्या नगर विभागाच्या कामलाही गती देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button